मुख्यमंत्री योजनादूत ५०००० पदांची ची भरती २०२४-२०२५
![]() |
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविणायत येत आहे .
योजनेचा उद्देश्य
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार,प्रसिद्धी करणे .
योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळविण्यास साहाय्य करणे .
राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता योजनादूत नेमले जातील .
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचातीसाठी १ व शहरी भागात ५००० लोकसंख्येसाठी १ योजनादुत या प्रमाणात एकूण ५०००० योजनदूतांची निवड करण्यात येईल .
योजनदूतास प्रत्येकी १०००० प्रति महा मानधन मिळेल
योजनदूतास ६ महिन्यांचा करार केला जाईल.
पात्रता
- वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार .
- शैक्षणिक अहर्ता -कोणत्याही शाखेचे पदवीधर .
- संगणक ज्ञान आवश्यक .
- मोबाईल असणे आवश्यक .
- महाराष्ट्राचा आधिवासी असणे आवश्यक .
- आधार कार्ड व बँक खाते आधार संलग्न असावे .
आवश्यक कागदपत्रे
- मुख्यमंत्री योजनादुता साठीचा online अर्ज
- आधार कार्ड
- पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- अधिवासी दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- हमीपत्र
नेमणूक प्रकिया
- ऑनलाईन अर्जाची बाह्यससंस्थेमार्फत छाननी
- छाननी पात्रतेच्या निकषानुसार केली जाईल
- छाननी नंतर यादी राज्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल . जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारीच्या कागदप्रत्राची तपासणी करतील . यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर ६ महिन्याचा करार केला जाईल . करारच कालावधी कोणत्याही परिथितीत वाढविला जाणार नाही .
योजनादूतांची कामे
- योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी याच्या संपर्कात राहून जिल्यातील योजनांची माहिती घेतील .
- योजनादुतानी त्यांना नेमून दिलेल्या ठिकणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील .
- योजनादूत योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करतांना ग्राम पातळीवर यंत्रणांशी समव्यय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील.
- दर दिवशीचा केलेल्या कामाचा अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील.
- योजनादूत कोणतेही नियमबाह्य काम करणार नाही तसे करताना आढळल्यास त्याच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात येईल .
- योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहील .
0 Comments