महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी  रोजगार योजने अंतर्गत कुक्कुटपालन  शेड योजनेचे अनुदान  मिळविण्याबाबत माहिती

ग्रामीण भागात प्रामुख्याने शेती व पशुपालन बरोबर कुकुटपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो . शेतकरी बेरोजगार तरुण यांचे उत्पनाचे प्रमुख साधन देखील आहे . शेतकरी आणि बेरोजगार तरुण याच्या साठी अर्थसहाय्य करण्या साठी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अंतर्गत कुकुटपालन शेड अनुदान योजना राबवण्यात येत आहे . 

उद्देश 

कुक्कुटपालक शेतकऱ्यांना  आर्थिक साहाय्य देणे असून शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. 

योजनेचे नियम व अटी 

  1. अर्जदार महाराष्ट्र राज्यच रहिवासी असणे आव्यश्यक आहे . 
  2. अर्जदार अल्पभूधारक असावा 
  3. यापूर्वी योजनेचं लाभ घेतलेला नसावा 
  4. आवश्यक कागदपत्रे 
  5. अर्जदार मागणी पत्र 
  6. ग्रामपंचायत ग्रामसभेचा  सभेचं ठराव 
  7. अर्जदार जॉबकार्ड अर्जदार पासबुक 
  8. आधार कार्ड 
  9. जागेचा  ७/१२ उतारा व ८ अ
  10. मा. तहसीलदार याच्या समोर संमतीपत्र (१०० रु. बॉण्डपेपर )
  11. १०० पक्षी (कोंबडया ) असल्याचा पशुधन विभागाचं दाखला 
  12. कोंबडया नसल्यास बांधकाम झाल्यानंतर १ महिन्यात कोंबड्या घेणंच  (१०० रु. बॉण्डपेपर )
          कुक्कुटपालन शेड पासून ५०० मीटर मध्ये घरे असल्यास ग्रामपंचायत नाहरकत दाखल  आवश्यक 

अर्ज कसा करायचा 

अर्जाची  pdf डाउन्लोड करा 

वरील अर्ज पूर्ण भरून आणि आवश्यक कागद पात्राची पूर्तता करून ,आपण भरलेला अर्ज ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक याच्या कडून घेऊन त्यावर ग्रामसेवक , सरपंच,तलाठी  याच्या सह्या घेऊन ग्राम रोजगार सेवकाच्या मदतीने तो फॉर्म पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती कार्यालय जमा करावयाचं आहे 
अधिक माहितीसाठी आपल्या  येथील रोजगार सेवाकाशी संपर्क  करा.