मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री  लाडकी बहीण योजने प्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हि सुद्धा राज्य शासनाची एक  महत्वकांशी योजना आहे .ज्यात उज्वला योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना या योजने अरतर्गत वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर मिळणार .महिलांच्यानावाने  LPG गॅस कनेक्शन आहे अशा महिलांसाठी योजना आहे.  महिलांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर  मोफत मिळणार आहे. उज्वला योजनेतील महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्त्याना सुद्धा फायदा मिळणार. 

योजनेची पात्रता 

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्त्याचे कुटूंब या योजनेसाठी पात्र असणार. 
  • योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक . 
  • राज्यातील उज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र . 
  • कुटुंबात रेशनकार्ड नुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असणार. 
  • घरगुती सिलेंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांना हि योजना लागू असणार. 

अर्ज कसा करणार ?

पंतप्रधान उज्वल योजने अंतर्गत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत ज्या महिलांनी अर्ज करून लाभ मिळविला आहे अशा महिलांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. 

योजनेसह स्वरूप कसे आहे 

या योजने अंतर्गत LPG गॅस चे वितरण तेल कंपन्या मार्फत केले जाईल. 
पतंप्रधान उज्वला योजने अंतर्गत वितरित होणाय्रा गॅस सिलेंडरच्या बाजार भावाची संपूर्ण किंमत ग्राहकाकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र सरकार कडून पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत देण्यांत येणारी सबसिडी थेट लाभार्त्याच्या बँक खात्यात जमा होणार. त्याच प्रमाणे तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यायची ५३० पत्री सिलेंडरची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास त्याची सबसिडी दिली जाणार नाही 
१ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्त्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. १ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाही.