नवीन ट्रॅक्टर अनुदान
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी नवीन अर्ज सुरु झाले आहेत. खालील प्रकारे अर्ज करू शकता . शेतीचे काम करण्यासाठी काही महत्वपूर्ण यंत्राची गरज भासते. त्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण यंत्र ट्रॅक्टर आहे. जर तुम्हाला सुद्धा ट्रॅक्टर ची गरज भासत असेल पण आर्थिक गणित बसत नसेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारची योजना तुम्हाला मदगार होऊ शकते.
ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे पण पूर्ण पैसे देणे शक्य नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकार ४० ते ५० टक्के अनुदान देत आहे.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
- योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधी महाडीबीटी वर नोंदणी करणे गरजेचे आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Logout या site नोंदणी करू शकता .
- नोंदणी केल्या नंतर महाडीबीटी site वर लॉग इन करा
- कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर किल्क करा
- कृषी औजाराची खरेदी साठी अर्थसहाय्य ,ट्रॅक्टर आणि २ डब्लू डी हे पर्याय भरून विचारलेली माहिती भरा , आणि अर्ज सादर करा.
- मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्जाची पावती डाउनलोड करू शकता.
- मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यावर क्लिक करून आपण अर्जाची स्थिती सुद्धा पाहू शकता.
0 Comments